Ad imageAd image

हडलगा येथे बसची सोय करा : म. ए. समितीने दिले आगार व्यवस्थापकांना निवेदन

Ravindra Jadhav
हडलगा येथे बसची सोय करा : म. ए. समितीने दिले आगार व्यवस्थापकांना निवेदन
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

खानापूर : हडलगा येथे बस फेरी सुरू करावी अशा मागणीचे निवेदन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती आणि या भागातील विद्यार्थ्यांनी खानापूर आगार व्यवस्थापकांना दिले.

हडलगा (ता.खानापूर) येथील विद्यार्थी वर्गाने काल एक व्हिडिओ प्रसारित करून हडलग्यासाठी बसची मागणी केली होती. याची दखल घेत खानापूर म.ए. समिती व युवा समिती खानापूर यांनी आज खानापूर बस डेपो मॅनेजर महेश तिरकन्नवर यांची भेट घेऊन बस उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
मॅनेजर तिरकन्नवर यांनी त्या भागाचा सर्वे करून बस उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

यावेळी खानापूर समितीचे अध्यक्ष सूर्याजी पाटील, युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, माजी तालुका सभापती सुरेश देसाई, लक्केबैल पीकेपीएसचे माजी अध्यक्ष रवी पाटील व राजू पाटील उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article