बेळगाव : सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना आयोजित 14 व्या राज्यस्तरीय खुल्या सागरी जलतरण स्पर्धेत स्वीमर्स क्लब बेळगावच्या जलतरण पटूंनी 3 सुवर्णासह एकूण 7 पदकांची कमाई केली.
मालवण येथील चिवला बीच येथेही राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा झाली. या स्पर्धेत स्विमर्स क्लबच्या जलतरणपटूंनी 3 सुवर्ण पदके, 2 रौप्य पदके आणि 2 कांस्य पदकांचा अशी 17 पदके मिळविली.
जलतरण स्पर्धेत स्वीमर्स क्लबचच्या जलतरणपटूचा निकाल :
वेदांत मिसाळे : 2 कि.मी मध्ये पहिला, शरण्या कुंभार : 1ली -1 कि.मी., स्कंद घाटगे : पहिला -1 कि.मी. आणि 7 वा -1 कि.मी., अनिश पै : 2रा -10 कि.मी. आणि तिसरा -3 कि.मी., इंद्रजीत हलगेकर : 2रा -3 कि.मी., श्रीदत्त पुजारी : तिसरा -1 कि.मी., अहिका हलगेकर : 5वी -2 कि.मी., रिदम त्यागी : 6वा -3 कि.मी., पाखी हलगेकर : 7वी -1 कि.मी. 10वी -1 कि.मी., कौशिक पंडित : 10 कि.मी. शर्यत पूर्ण.
वरील जलतरणपटू प्रशिक्षक उमेश कलघटगी, अक्षय शेरेगर, अजिंक्य एम. नितीश कुडूचकर , गोवर्धन काकतकर , इम्रान उचगावकर आणि प्रसाद वेर्णेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगाव येथील केएलईच्या सुवर्ण जेएनएमसी जलतरण तलावात प्रशिक्षण घेत सराव करतात.