Ad imageAd image

काकती विभागस्तरीय प्रतिभा कारंजी स्पर्धा उत्साहात : 40 शाळांनी घेतला होता भाग

Ravindra Jadhav
काकती विभागस्तरीय प्रतिभा कारंजी स्पर्धा उत्साहात : 40 शाळांनी घेतला होता भाग
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव (bn7 news) : काकती विभागीय पातळीवरील प्रतिभा कारंजी स्पर्धा काकती मराठी शाळेत पार पडल्या. स्पर्धेत सुमारे 40 शाळांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनिंनी भाग घेतला होता.

यावेळी झालेल्या उदघाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी शाळा एसडीएमचे अध्यक्ष अनिल गवी होते. प्रमुख अतिथी म्हणून ग्रामपंचायत अध्यक्षा वर्षा मुचंडीकर, जिल्हा पंचायतचे माजी सदस्य सिद्धगौडा सुनगार, तालुका पंचायतचे माजी सदस्य यल्लाप्पा कोळेकर, पालकमंत्र्यांचे आप्त सहाय्यक जंगलीसाब नाईक, प्राथमिक शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष प्रकाश दयनावर, सरकारी हायस्कूलचे मुख्याध्यापक अशोक खोत आदी उपस्थित होते.

प्रास्ताविक आणि स्वागत शाळेचे मुख्याध्यापक किरण करंबळकर यांनी केले. या कार्यक्रमात तालुका आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शाळा शिक्षक व निवृत्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. तसेच मराठी शाळा काकती या एसडीएमसीला आदर्श एसडीएमसी पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. प्रतिभा कारंजी स्पर्धेमध्ये काकती, कंग्राळी आणि भुतरामहट्टी येथील जवळजवळ 40 शाळांनी भाग घेतला होता.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका के. एल. जगताप यांनी केले. तर आभार प्रदर्शन शिक्षिका कल्याणी घोडके यांनी केले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article