कॅपिटल वन संस्थेला 32.18 लाख रुपयांचा नफा : सभासदांना 8 टक्के लाभांश : 16 व्या सर्वसाधारण सभेत देण्यात आली माहिती

Ravindra Jadhav
कॅपिटल वन संस्थेला 32.18 लाख रुपयांचा नफा : सभासदांना 8 टक्के लाभांश : 16 व्या सर्वसाधारण सभेत देण्यात आली माहिती
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

बेळगाव, दिनांक 22 : कॅपिटल वन संस्थेला आर्थिक वर्षात 18, 134.64 रुपये नफा झाला असून संस्थेने सभासदांना 8 टक्के लाभांश जाहीर केला असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव हंडे यांनी दिली आहे.

या संस्थेची 16 वी वार्षिक सर्वसाधारण सभा श्री सत्यविनायक मंदिर, छत्रेवाडा अनुसरकर गल्ली येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव हंडे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. या सभेत शिवाजीराव हंडे यांनी उपरोक्त माहिती दिली. 

दि 31 मार्च 2024 अखेर संस्थेने सुमारे 20 कोटी 21 लाख रुपयांच्या ठेवी 155.02 कोटी रुपयांचे खेळते भांडवल व 32, 18, 134.64 रुपये इतक्या विक्रमी नफ्याची नोंद केली आहे अशी माहिती देत सभासदांना 8% लाभांश देण्याची घोषणा देखील यावेळी करण्यात आली.

संस्थेच्या आर्थिक कामकाजा बरोबरच सांस्कृतिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उपक्रम राबवून गेली 15 वर्षे एकांकिका स्पर्धा आयोजित करत आहे. यंदा या उपक्रमाअंतर्गत संस्थेने अखिल भारतीय स्तरावर एकांकिका बाल्य नाट्य लेखन स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले, भविष्यात संस्थेच्या उलाढालीमध्ये वाढ करण्यासाठी कर्जदारांना कमीत कमी व्याजदरात कर्जपुरवठा तर ठेवीदारांना जास्तीत जास्त व्याजदर देण्याचा संस्था प्रयत्न करीत आहे, असेही सभेत सांगण्यात आले.

संस्थेच्या प्रभारी समन्वयक स्नेहल कंग्राळकर यांनी अहवालाचे वाचन व सभेपुढील विषय वाचले. यावेळी प्रत्येक विषय व अहवालावर सविस्तर विवेचन शिवाजीराव हंडे यांनी केले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष शाम सुतार, रामकुमार जोशी, शिवाजीराव अतीवाडकर, सदानंद पाटील, शरद पाटील, संजय चौगुले, भाग्यश्री जाधव, नंदा कांबळे तसेच मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते. संस्थेचे पदाधिकारी कर्मचारी पिग्मी संकलकांनी सभेच्या आयोजनामध्ये विशेष योगदान दिले.
संस्थेचे उपाध्यक्ष शाम सुतार यांनी आभार प्रदर्शन केले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article