गिरीस्तुती चेकमेट स्कुल ऑफ चेस आयोजित राज्यस्तरीय बुद्धीबळ स्पर्धेला प्रारंभ : 250 बुद्धिबळपटूंनी घेतलाय स्पर्धेत भाग

Giristuti statelevel Chess competition in belgaum

Ravindra Jadhav
गिरीस्तुती चेकमेट स्कुल ऑफ चेस आयोजित राज्यस्तरीय बुद्धीबळ स्पर्धेला प्रारंभ : 250 बुद्धिबळपटूंनी घेतलाय स्पर्धेत भाग
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव, दिनांक 30 ( प्रतिनिधी) : गिरीस्तुती चेकमेट स्कुल ऑफ चेस फौंडेशन, बेळगाव आयोजित कर्नाटक राज्य 11 वर्षांखालील खुल्या गटाकरिता फिडे रेटेड चेस चॅम्पियनशिप-2024 तसेच कर्नाटक राज्य मुलींकरिता 11 वर्षांखालील वयोगटासाठी बुद्धीबळ स्पर्धेला उत्साहात प्रारंभ झाला.
शास्त्रीनगर-बेळगाव येथील गुजरात भवन येथे होत असलेल्या या स्पर्धेत 250 बुद्धीबळपटूंनी भाग घेतला असून यामध्ये 11 वर्षांखालील 71 रेटेड बुद्धिबळपटू सहभागी झाले आहेत.

स्पर्धा उदघाटन समारंभाला लायन्स क्लब ऑफ बेळगावचे दुसरे उपजिल्हा प्रांतपाल लायन एमजेएफ राजशेखर हिरेमठ यासह इंडस आल्टम इंटरनॅशनल स्कुलचे मार्केटिंग प्रमुख उज्वल, बेळगाव जिल्हा बुद्धीबळ संघटनेचे ( बीडीसीए ) अध्यक्ष दिनेश भिराडे, उपाध्यक्ष बी. एस. बागेवाडी, सचिव आकाश मडीवाळर, सहसचिव शगुफ्ता खान, ‘लायन्स’च्या दया शहापुरकर, ‘लिओ’च्या सचिव सुमेधा भिराडे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित केल्यानंतर प्रमुख अतिधी राजशेखर हिरेमठ व एका स्पर्धक बुद्धीबळपटूच्या हस्ते बुद्धीबळ पटावरील मोहरा हलवून स्पर्धेला चालना देण्यात आली.

याप्रसंगी स्पर्धेचे मुख्य अर्बीटर प्रमोदराज मोरी (आयए), उप मुख्य अर्बीटर प्रणेश यादव के ( आयए), अर्बीटर आकाश मडीवाळर (एसएनए) अर्बीटर सक्षम जाधव (एसएनए), स्पर्धा आयोजक गिरीश बाचीकर यासह बीडीसीए सदस्य, स्पर्धक आणि पालक उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article