डीवायईएस ज्युडो सेंटरच्या ज्युडो खेळाडूंनी पटकावली 16 पदके : सुवर्णपदक विजेते खेळणार राष्ट्रीय पातळीवर

Ravindra Jadhav
डीवायईएस ज्युडो सेंटरच्या ज्युडो खेळाडूंनी पटकावली 16 पदके : सुवर्णपदक विजेते खेळणार राष्ट्रीय पातळीवर
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : 40 व्या कर्नाटक राज्य कनिष्ठ आणि वरिष्ठ ज्युडो अजिंक्यपद स्पर्धेमध्ये बेळगावच्या डीवायईएस ज्युडो सेंटरच्या ज्युडो खेळाडूंनी 10 सुवर्णपदकांसह 4 रौप्य पदके आणि 2 कांस्य अशी एकंदर 16 पदके मिळविली असून सुवर्णपदक विजेत्यांनी राष्ट्रीय स्पर्धेपर्यंत मजल मारली आहे.

बेंगळूर येथील जे.पी.नगर येथे झालेल्या स्पर्धेत बेळगावच्या डीवायईएस ज्युडो सेंटरच्या ज्यूडोपटूंनी 16 पदकांसह अजिंक्यपदाचे दोन करंडक देखील मिळविले आहेत.

भूषण वनारसे (73 किलो सुवर्ण व कांस्य), आर्यन डोंगळे (81 किलो सुवर्ण), रोहन बी. एस. (90 किलो सुवर्ण व रौप्य), सौरभ भावीकट्टी (55 किलो रौप्य), धनुष्य एल. (60 किलो कांस्य), भाग्यश्री बी. (48 किलो सुवर्ण) संजना कुरबर (52 किलो सुवर्ण), सहाना एस. आर. (57 किलो सुवर्ण), राधिका डुकरे (70 किलो दोन सुवर्ण) साईश्वरी के. (78 किलो दोन सुवर्ण), अक्षता सुनकद (63 किलो सुवर्ण), पार्वती अंबाली (70 किलो रौप्य), त्रिवेणी कलकुटगी (78 किलो रौप्य) अशी सुयश मिळविलेल्या ज्यूडो खेळाडूंची नावे असून यामधील सुवर्ण पदक विजेत्या ज्युडो खेळाडूंची निवड नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी क्रीडांगणावर येत्या जानेवारी महिन्यात होणाऱ्या वरिष्ठ राष्ट्रीय ज्युडो अजिंक्यपद स्पर्धेसाठी झाली आहे.

हे यशस्वी ज्युडो खेळाडू कर्नाटक युवा सक्षमीकरण आणि क्रीडा खात्याच्या बेळगाव येथील डीवायईएस इनडोअर ज्युडो हॉलमध्ये ज्युडो प्रशिक्षिका एकलव्य पुरस्कार विजेत्या रोहिणी पाटील आणि आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या ऋतुजा मुल्तानी यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यूडो खेळाचा सराव करत असून त्यांना डीवायईएस खात्याचे उपसंचालक श्रीनिवास बी. यांचे प्रोत्साहन लाभत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
TAGGED:
Share This Article