एस के ई. संस्थेत बाबूराव ठाकूर यांची 125 वी जयंती साजरी

Ravindra Jadhav
एस के ई. संस्थेत बाबूराव ठाकूर यांची 125 वी जयंती साजरी
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव :;येथील एस के ई संस्थेच्यावतीने संस्थापकांपैकी एक असलेले कै. बाबुराव ठाकूर यांची 125 वी जयंती येथील जी. एस. एस. आणि आर. पी. डी. महाविद्यालयाच्या ग्रंथालयात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला एस के ई संस्थेचे सेक्रेटरी मधुकर सामंत, डिग्री कॉलेजच्या अध्यक्षा श्रीमती माधुरी शानभाग, उपाध्यक्षा श्रीमती बिंबा नाडकर्णी आणि दोन्ही कॉलेजच्या प्राचार्यांच्या हस्ते बाबुराव ठाकूर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. त्यानंतर बाबुराव ठाकूर यांच्या कार्याचा आढावा घेणारा प्रा. विजयकुमार पाटील यांचा लेख मराठी विषय प्रमुख परसु गावडे यांनी वाचून दाखवला.रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संदीप देशपांडे यांनी आभार व्यक्त केले.
प्रास्ताविक ग्रंथपाल नमिता चंदगडकर यांनी केले. यावेळी जी. एस. एस. कॉलेजचे प्राचार्य अरविंद हलगेकर, पि. यू. कॉलेजचे प्राचार्य सुभाष देसाई आणि आर. पी. डी.चे प्रभारी प्राचार्य एम. एस. कुरणी आणि पी. यु. कॉलेजच्या प्राचार्या सुजाता विजापुरे यांच्यासह लोकमान्य एज्युकेशनचे प्रा. मिसाळे, जांबोटी कॉलेजच्या प्राचार्या पाटकर आणि दोन्ही संस्थांचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article