व्यक्तींच्या भावनांचा अविष्कार म्हणजे साहित्य होय : निवृत्त प्राचार्य शामराव पाटील

Ravindra Jadhav
व्यक्तींच्या भावनांचा अविष्कार म्हणजे साहित्य होय : निवृत्त प्राचार्य शामराव पाटील
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

येळळूर : मराठी भाषा आणि संस्कृती टिकवण्याचे खरे काम येळळूर गाव साहित्य संमेलनाच्या माध्यमातून करीत आहे, व्यक्तीच्या मनामध्ये उचबंळून आलेल्या  भावनांचा अविष्कार म्हणजे साहित्य होय, समाजाला प्रवृत्त करून उन्नत करण्याचे काम साहित्य करीत असते, विचारवंत समाज निर्माण करण्यासाठी साहित्य संमेलनाची गरज आहे, संमेलनाच्या माध्यमातून वाचन चळवळ वाढीला लागली पाहिजेत. असे विचार निवृत्त प्राचार्य शामराव पाटील यांनी व्यक्त केले.

येत्या 5 जानेवारी रोजी होणाऱ्या 20 व्या येळळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ रोपण कार्यक्रम आज शनिवार दिनांक 28 रोजी झाला. यावेळी निवृत्त प्राचार्य   शामराव पाटील वक्ते म्हणून बोलत होते. 20 व्या साहित्य संमेलनाची मूर्तमेढ अभियंते व उद्योजक हणमंत कुगजी  व त्यांच्या पत्नी उज्वला कुगजी यांच्या हस्ते येळळूरवाडी शाळेच्या पटांगणावर रोवण्यात  आली. माजी आमदार परशुराम भाऊ नंदीहळळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

यावेळी अभियंते हणमंत कुगजी म्हणाले, सुदृढ समाज निर्माण करण्यासाठी ग्रामीण साहित्य संमेलनाची आज गरज आहे, विद्यार्थ्यांनी मोबाईल व टीव्हीपासून दूर राहून वाचन संस्कृती वाढविली पाहिजेत. यावेळी चांगळेश्वरी  शिक्षण मंडळाचे संस्थापक वाय. एन. मजुकर, संमेलनाचे नियोजित स्वागताध्यक्ष  दुधाप्पा बागेवाडी, गुरुवर्य परशुरामभाऊ नंदीहळळी यांनीही आपले विचार मांडले.

प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष परशराम मोटराचे यांनी केले तर स्वागत कार्याध्यक्ष प्रा. सी.एम. गोरल यांनी केले. यावेळी येळळूर ग्रामपंचायत अध्यक्षा लक्ष्मी मासेकर, माजी तालुका पंचायत सदस्य रावजी पाटील, नवहिंद क्रीडा केंद्राचे अध्यक्ष शिवाजी सायनेकर, माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष दुधाप्पा बागेवाडी, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष अशोक नाईक, मुख्याध्यापक, एम बी बाचीकर, बबन कानशिडे, मोहन पाटील, राजेंद्र चलवादी, चांगळेश्वरी शिक्षण मंडळाचे सचिव प्रसाद मजुकर,यल्लुप्पा पाटील,  बी एन मजुकर, डॉ. तानाजी पावले, रमेश धामणेकर, परशराम बिजगरकर,संजय मजुकर, सुभाष मजुकर, बळीराम देसुरकर, रामा पाखरे  अमोल जाधव, जयंत मोटराचे, प्रशांत सुतार , मदन कुडूचकर, सौ.विद्या पाटील सौ. रेखा पाटील, एस.पी.मेलगे, यांच्यासह श्री शिवाजी विद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. शेवटी अमोल जाधव यांनी आभार मानले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article